फलटणमध्ये ‘सेव्हन्थ हेवन’ केक शॉपीच्या दुसर्‍या शाखेचे उद्घाटन; विराज धुमाळ यांची व्यवसायातील प्रगती कौतुकास्पद : रविंद्र बेडकिहाळ

स्थैर्य, फलटण : ‘सेव्हन्थ हेवन’ या नामाकिंत केक शॉपीच्या माध्यमातून फलटणकरांना उच्चदर्जाचे केक देण्यात विराज धुमाळ यशस्वी झाले आहेत. ही केक शॉपी अल्पावधीत फलटणकरांच्या प्रसंतीस  उतरल्यामुळे आज या शॉपीची दुसरी शाखा सुरु झाली आहे. तत्पर सेवा व उच्च दर्जा या सूत्रामुळे युवा व्यावसायिक विराज धुमाळ यांची व्यवसायात झालेली प्रगती कौतुकास्पद आहे, गौरवोद्गार, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी काढले. 


येथील रिंग रोडवरील हॉटेल आर्यमाननजिक गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर धुमाळ यांच्या ‘सेव्हन्थ हेवन’ केक शॉपीच्या दुसर्‍या शाखेचे उद्घाटन रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राजेंद्र धुमाळ, एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचचे जिल्हाध्यक्ष विकास खांडेकर व त्यांचे सहकारी, मित्र परिवार व धुमाळ कुटूंबिय उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत राजेंद्र धुमाळ व विराज धुमाळ यांनी केले. 


रविंद्र बेडकिहाळ यांचे स्वागत करताना विराज धुमाळ. समवेत भारद्वाज बेडकिहाळ, ऋषिकेश निंबाळकर, संकेत बाबर, प्रशांत भोसले, सुरज गुंजवटे, सौरभ डहाळे, अक्षय जाधव, प्रणव पवार.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya