ढेबेवाडीत कोरोनाचा शिरकाव
स्थैर्य, पाटण, दि. 11 : ढेबेवाडी येथील स्थानिक रहिवासी असलेल्या व्यावसायिकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संपूर्ण विभागाचे मध्यवर्ती केंद्रस्थान असलेल्या ढेबेवाडीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाजारपेठ तीन दिवस बंद करण्यात आली आहे. ढेबेवाडी बाजारपेठेतील कोरोना बाधित व्यवसायिकांची संख्या दोन झाली आहे.


ढेबेवाडी येथील स्थानिक रहिवासी असलेल्या व्यावसायिकांला सर्दी, ताप अशी लक्षणे दिसल्यावर त्याच्या नातेवाइकांनी कराड येथे त्यांची कोरोना चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल काल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाला हादरा बसला. आरोग्य विभागाने निकट सहवासित तपासणी सुरू केली तर पाटण आरोग्य विभागाने त्यांना सातारा येथील शासकीय रुग्णालयात त्यांना पाठविले आहे. यापूर्वी औषध दुकानदार असलेला एक व्यावसायिक कोरोना पॉझिटिव्ह सापडला होता. तो परगावचा रहिवासी होता. मात्र आज सापडलेला ढेबेवाडीचा स्थानिक रहिवासी आहे. त्यामुळे ढेबेवाडी बाजारपेठेत चिंता पसरली आहे. बाधिताचे कुटुंबीय होम क्वारन्टाईन झाले आहे.पण यामुळे ढेबेवाडीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .


ढेबेवाडी बाजारपेठ ही परिसरातील अनेक गावांंसह विभागाची मध्यवर्ती बाजारपेठ आहे. शाळा, महाविद्यालयासह, वनविभागीय कार्यालय, अनेक शासकीय विभागाची कार्यालये, पोलीस ठाणे, बँका,पतसंस्था, हॉस्पिटल्स येथे आहेत. यामुळे अनेक गावातील नागरिकांना कामानिमित्त ढेबेवाडी येथे यावे लागते. अनेक गावामध्ये कोरोना फैलाव होऊन सुद्धा आजखेर सुरक्षित राहिलेल्या ढेबेवाडीत कोरोनाच्या एन्ट्रीमुळे सर्व विभागात चिंता वाढली आहे. ढेबेवाडी विभाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. मुंबई, पुण्याचा बहुतांशी घराघरांचा संपर्क असलेला हा विभाग मे पर्यंत सुरक्षित होता मात्र मे मध्ये पहिल्यांदा बनपुरीत व नंतर विभागातल्या तीस गावांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला असून रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली आहे. विभागाला कोरोनाचा विळखा पडला आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाची पुरती दमछाक झाली आहे. मात्र दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढतच आहे. ढेबेवाडी विभागात तीसवर गावात कोरोना घुसला आहे तर रुग्ण संख्येने शंभरी पार केली आहे. या बाजार पेठेशी सर्व गावांचा नित्य संपर्क येतो. त्यामुळे ढेबेवाडी बाजारपेठेतील कोरोनाचा शिरकाव चिंता वाढवणारा ठरला आहे.


सोमवारी ढेबेवाडीतील रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर दुपारी प्रशासनाने रुग्णाच्या घरी तातडीने पोहचले. डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. रुग्णास हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिटची गरज होती. सायंकाळपर्यंत रुग्णवाहिका येईल अशी नातेवाइकांना अपेक्षा होती. मात्र दुसरा दिवस उजाडला तरीही रुग्णवाहिका न आल्याने नातेवाईक अगतिक झाले होते. अखेर सकाळी साडे अकराच्या सुमारास रुग्णवाहिका येऊन रुग्णास उपचारासाठी सातारा येथे घेऊन गेल्याने नातेवाइकांचा जीव भांड्यात पडला. यानंतर उपचार करण्यासाठी रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याने रुग्णास वेळेत उपचार मिळण्यासाठी अडचणी येत असल्याच्या चर्चेने सर्वसामान्यांची काळजी वाढली आहे.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.