कलारत्न सहकारी संस्थेने पहिल्याच वर्षी केलेला कार्यक्रम प्रेरणादायी : डी. के. पवार

स्थैर्य, फलटण : स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण समारंभासाठी केलेले नेटके नियोजन, शिस्तबद्ध कार्यक्रम, कारगिल युद्धात सहभागी माजी सैनिकांचा सत्कार या बाबी निश्चित कौतुकास्पद आहेत. कलारत्न सहकारी संस्थेने पहिल्याच वर्षी केलेला कार्यक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महानंद, मुंबईचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी केले.


कलारत्न सर्वसाधारण सहकारी संस्था, फलटणच्यावतीने आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी सैनिक प्रमोद काकडे, माणिक शहा, कामगार नेते तानाजी वाघ, उषा राऊत, यांच्यासह संस्थेचे संचालक, व्यवस्थापकीय संचालक बकुळ पराडकर व सभासद उपस्थित होते. मुद्रण क्षेत्रातील एक नामवंत संस्था म्हणून कलारत्न सहकारी मुद्रणालय भविष्यात उंच भरारी घेईल, अशा पद्धतीने कामकाज करण्याचा मनोदय व्यक्त करत संस्थेचे चेअरमन संदीप जाधव यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. 

Previous Post Next Post