जय भवानीच्या अध्यक्षपदी जनार्दन मोरे

 

जय भवानी पतसंस्थेचे नुतन अध्यक्ष जनार्दन मोरे, उपाध्यक्ष दादासाहेब घाडगे यांच्या सत्कार प्रसंगी मान्यवर. (छाया : समीर तांबोळी)स्थैर्य, कातरखटाव, दि. १८ : निमसोड (ता. खटाव) येथील जय भवानी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या अध्यक्षपदी युवा नेते जनार्दन महादेव मोरे (काका) यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी दादासाहेब रामचंद्र घाडगे यांना सर्वानुमते संधी देण्यात आली.


मावळते अध्यक्ष बाबासाहेब जाधव यांनी गांव पार्टी अंतर्गत समझोत्यानुसार राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी सहाय्यक निबंधक उमेश उमरदंड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. यावेळी मार्गदर्शक नंदकुमार मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष पदासाठी माजी अध्यक्ष विजय भादुले यांनी जनार्दन मोरे यांचे नांव सुचविले त्यास राकेश खिलारे यांनी अनुमोदन दिले. तर दादासाहेब घाडगे यांच्या उपाध्यक्ष पदासाठी बाबासाहेब जाधव, सौ. सविता मोरे सुचक, अनुमोदक होते. यावेळी संचालक विजय मोरे, प्रल्हाद मोरे, आनंदा मोरे, महादेव दगडे, देवधन देवकर, सौ. नंदा मोरे यांच्यासह सहाय्यक निबंधक कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी बाळासाहेब भोसले, व्यवस्थापक शामराव दडस, आदींसह मान्यवर उपस्थित होते. निवडीनंतर नुतन पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यावेळी बोलताना  मोरे म्हणाले, जय भवानी संस्था ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे आजपर्यंत चालत आली आहे. मागील पदाधिककार्‍यांचा आदर्श घेवून यापुढच्या काळातही चांगल्या पध्दतीने काम केले जाईल. पतसंस्थेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगारसंधी उपलब्ध करुन देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya