भाजपच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी जयकुमार शिंदे यांची निवड

स्थैर्य, फलटण : भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर याचे निष्ठावंत सहकारी, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक जयकुमार शिंदे यांची निवड झालेली आहे. 


जयकुमार शिंदे यांनी सहकार क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात उत्तम व उल्लेखनीय कार्य केलेले आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे सहकारी म्हणून काम करणे अशी जयकुमार शिंदे यांची ओळख आहे. भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी जयकुमार शिंदे यांची निवड केलेली आहे. जयकुमार शिंदे यांच्यावर फलटण व माण तालुका या दोन तालुक्याची पक्ष संघटनेच्या काम करण्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्याकडून पक्ष संघटनेचे चांगले काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. 


फलटण  व माण तालुक्यातील पक्ष संघटनेच्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची वाटचाल गतिमान करणार आहे. त्या सोबतच फलटण व माण तालुक्यातील प्रत्येक गावागावात भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी उभी करणार असल्याचे जयकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले. 

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.