महाराष्ट्राची वरदायिनी कोयना, दुष्काळी तालुक्याचा कलंक पुसून वरदायिनी ठरणार-जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना विश्वास.

 स्थैर्य, पाटण, दि. १९ : कोयना धरणातून नदीपात्रातून विनावापर सोडण्यात येणारा पाणीसाठा दुष्काळी सिंचन योजनेला देण्याचा बहुउद्देशीय निर्णय महाविकास आघाडी शासनाने घेतला आहे.याची अंमलबजावणी सुध्दा सुरु झाली आहे.पूरपरस्थिती निर्माण होवून जनतेचे शिव्याशाप घेण्यापेक्षा दुष्काळी तालुक्यातील जनतेच्या माथ्यावर लागलेला कलंक पुसून दुष्काळी जनतेला न्याय देण्याची भुमिका शासनाची असून राज्यासाठी वरदायिनी ठरलेली कोयना दुष्काळी तालुक्यातील जनतेसाठी वरदायिनी ठरेल असा विश्वास राज्याचे जल संपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.


राज्याचे जलसंपदा जयंत पाटील  यांनी आज कोयना धरणाला भेट देवून पूरपरस्थिती कशी हाताळली जाते. याबाबत कोयना प्रशासन सतर्क आहे का नाही याची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्यच्या सोबत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, पाटण पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, कोयना प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, कार्यकारी अभियंता कुमार पाटील अतिरिकत पोलीस आधिकारी धीरज पाटील उपविभागीय पोलीस आधिकारी अशोक थोरात पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.


जलसंपदामंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले की संभाव्य पुराच्या पाश्वभूमीवर राज्यातील धरणातील पाण्याचे नियोजन करण्याचे काम सुरु आहे.आजपासून टेंभू , मैह्साळ योजना सुरु करण्यात आली असून तलाव भरण्यात आले आहेत.पुराच्या काळात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला दियावे अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती.यावर्षी पूर येण्यासारखी परस्थिती निर्माण झाल्याने आम्ही या निमित्ताने दुष्काळी भागाला पुराचे वाहून जाणारे पाणी देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


कोयना धरणाच्या डाव्या तीरावर उभारण्यात येत असलेल्या पायथा विज गृहाच्या कामाला लवकरच सुधारीत प्रशासकीय मान्यता देवुन हे काम तातडीने सुरु करण्याला मान्यता देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करून कोयना प्रकल्पग्रस्त युवकाच्या महानिर्मीती कंपनी मध्ये नोकरभरती च्या विषया बाबत मंत्रालयात बैठक घेवून या विषयावर तोडगा काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post Next Post