महंत नृत्य गोपाळ दास कोरोना पॉझिटिव्ह

 स्थैर्य, मुंबई, दि. १३ :  राम जन्मभूमी अयोध्येतील राम मंदिरात्या बहुप्रतिक्षित भूमीपूजनानंतर साधारण आठवड्याभराचा कालावधी लोटला आणि राम जन्मभूमी न्यासाचे मुख्य महंत नृत्य गोपाळ दास यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. गुरुवारी महंत कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निदान झालं. राम मंदिर भूमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी महंतसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित होते. याव्यतिरिक्त व्यासपीठावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, यांचीही या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. 


उत्तर प्रदेश सरकारकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार मथुरा जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येण्याची विचारणा उत्तर प्रदेशच्या  मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 


'माननीय मुख्यमंत्र्यांनी कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या महंत नृत्य गोपाळ दास यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. त्यांनी महंतांचे अनुयायी आणि मथुरेच्या जिल्हाधिकाऱ्यांशीची चर्चा केली आहे', असं सरकारच्या पत्रकात म्हणण्यात आलं असून, त्यांना तातडीनं शक्य त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात याबाबचे आदेश दिले आहेत.


जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दास यांच्या तापावर नियंत्रण मिळवलं आहे. पण, त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे.  त्यांच्या प्रकृतीविषयी सध्या चिंता करण्याचं कारण नाही. महंतांची एँटीजन टेस्ट करण्यात आली, ज्यामध्ये ते कोविड पॉझिटीव्ह असल्याचं निदान झालं. ज्यानंतर त्यांना मेदांतामध्ये दाखल करण्यात आलं. 

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.