विवाहितेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार करणाऱ्याला अटक


 


स्थैर्य, खंडाळा, दि. 25 : शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गावात अंगदुखी असताना लैंगिक उत्तेजना वाढवण्याचे औषध देत विवाहितेशी शरीरसंबंध ठेवत व्हिडीओ मोबाईलद्वारे गावात पसरविण्याची धमकी देत अत्याचार करणार्‍या अमोल वसंत गायकवाड युवकाला अटक केली आहे.


याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गावात अमोल गायकवाड याने विवाहितेबरोबर ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण केले. काही काळानंतर विवाहितेचे अंगदुखत असल्याने अमोल गायकवाड याने विवाहितेला अंगदुखीवरचे औषध सांगून लैंगिक उत्तेजना वाढविण्याचे औषध दिले. त्यानंतर त्याने विवाहितेबरोबर घरामध्ये शरीरसंबंध निर्माण केले. यावेळी अमोल गायकवाड याने काही काळानंतर विवाहितेला त्याचे व्हिडीओ गावामध्ये प्रसारीत करण्याची धमकी देत शरीरसंबंध प्रस्थापित केले. अमोल गायकवाड याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने शिरवळ पोलीस स्टेशनला धाव घेतली. यावेळी शिरवळ पोलीसांनी अमोल गायकवाड याला अटक केली. यावेळी अमोल गायकवाड याने गावातील आणखी दोन विवाहितांवर अशाच प्रकारे अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, अमोल गायकवाड याला शिरवळ पोलीसांनी खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने शुक्रवार दि.28 ऑगस्टपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक उमेश हजारे हे करीत आहे.