कोव्हीड (१९) साथीच्या संकटात "युथ बिझनेस इंटरनॅशनल या संस्थेबरोबर ‘तात्काळ मदत आणि पुनर्वसन’ कार्यात google.org यांचे सहकार्याने माणदेशीचा सहभाग - चेतना सिन्हा


म्हसवड-डिजिटल डेटा, व्हॉट्सअ‍प व फेसबुकचा वापर करत किराणा माल व्यवसायात यशस्वी झालेल्या तरडगावच्या माणदेशी उद्योजिका  सुवर्णा काकडे.स्थैर्य, म्हसवड, दि १९ : नेहमीच सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या म्हसवड शहरातील माणदेशी फौडेंशनने कोरोनाच्या काळात अर्थिक अडचणीत सापडलेल्या लघु उद्योगाला चालना देण्यासाठी युथ बिझनेस इंटरनॅशनल या संस्थेबरोबर एक पाऊल पुढे टाकत त्या उद्योगांना व उद्योजिकाना तात्काळ मदत मिळवुन देण्यासाठी मदत व पुनर्वसन या कार्यक्रमांतर्गत सामील झाली असल्याची माहिती माणदेशीच्या प्रमुख श्रीमती चेतना सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत दिली.


या कार्यक्रमाला google.org यांचे सहकार्य लाभले असल्याचेही श्रीमती सिन्हा यांनी यावेळी सांगितले. यावेळी माणदेशी फाऊंडेशच्या कार्यकारी विश्वस्त रेखा कुलकर्णी, प्रशासकिय अधिकारी वनिता शिंदे उपस्थित होत्या.


यावेळी बोलताना श्रीमती सिन्हा पुढे म्हणाल्या सी हा कार्यक्रम हा युथ बिझनेस इंटरनॅशनल (YBI) तर्फे व  Google org च्या मदतीने छोट्या उद्योजकांना अडचणीवर मात करण्यासाठी सहकार्य करता यावे यासाठी राबवला जात आहे. माणदेशी फौंडेशन गेल्या दोन दशकांपासून ग्रामीण भागातील उद्योजकांना मदतीचा हात आणि प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे .

YBI  ने भारतातील आपले लक्ष छोटे उद्योग करणाऱ्या पण सध्या अडचणीत असलेल्या महिलांना मदत करण्याकडे केंद्रीत केले आहे. कोव्हिड (२९)च्या साथीच्या संकटामुळे  जागतिक पातळीवर आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. भारतातीलही लघु उद्योगांनाही याचा जबरदस्त फटका बसल्याचे दिसत आहे. बरेच लोक या संकटातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी आमची माणदेशी फाऊंडेशन सेवाभावी सामाजिक संस्था नेहमी प्रमाणे पुढे सरसावली आहे.

कोव्हिड (१९) या साथीच्या रोगामुळे अडचणीच्या संकटामुळे यांना आम्ही मदत करतच आहोत. या कार्यासाठी YBI तर्फे Google org च्या मदतीने आम्हांला ‘YBI India’ ने जे तात्काळ मदत कार्य देऊ केले आहे, त्यामुळे आम्हीही त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत.


जागतिक स्तरावर ‘YBI’ ने अनेक उद्योगांना मदतीचा हात देऊ केला आहे. तसेच लघु आणि मध्यम उद्योगांनाही ते मदत करीत आहेत.३२ देशांमध्ये दोन लाख लघु आणि मध्यम उद्योगांना ते मदत करत आहेत,ज्यात संपूर्ण युरोप, मध्य–पूर्व, आफ्रिका आणि आशिया पॅसिफिकमधील देश यांचा समावेश आहे. यात कोव्हिड (१९) चा परिणाम झालेल्या देशांचाही समावेश आहे.युथ बिझनेस इंटरनॅशनलच्या सीईओ अनिता टायसेन सांगतात,


 “दिवसेंदिवस जगभरात हृदय हेलावून टाकणाऱ्या घटना घडत आहेत, या घटनांचे बळी ठरणाऱ्या लोकांबद्दल मला सहानुभूती आहे. कित्येक लोक या आर्थिक नुकसानाचे चटके सहन करू शकत नाहीत.अशा या आव्हानात्मक काळात, मला खरोखर अभिमान वाटतो तो ‘नेटवर्क सपोर्ट बिझनेस बोनस’ व YBI Google.org’. हे दोन लाख लघु आणि मध्यम उद्योगांना सहकार्य करून या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहे.


Google.org  इएमइए आणि एपीएइ चे प्रमुख रोवन बार्नेट सांगतात,“कोरोना व्हायरस या विनाशकारी महामारीने जे मृत्यूचे थैमान घातले आहे, त्यामुळे सर्व स्तरांतील लोकांना तसेच व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर याचा त्रास सहन करावा लागला आहे. गूगलच्या सहकार्याने हे लघु उद्योजक या संकटाचा सामना करू शकतील अशी आम्हाला आशा वाटते.

सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे राहणाऱ्या सुवर्णा काकडे या माणदेशी उद्योजिका आहेत. 


त्या किराणामालाचे छोटेसे दुकान चालवतात.त्या त्यांचा अनुभव सांगताना म्हणतात, ह्या लॉकडाउनच्या काळात मला किराणा मालाचे दुकान बंद करावे लागले.आम्ही घरात एकूण सहा माणसं आहोत आणि आमचे कुटुंब या व्यवसायावरच चालते. या संकटामुळे आमच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. मग आम्ही एक गाडी भाड्याने घेऊन घरोघरी, गावोगावी लोकांपर्यंत सुरक्षित माल पोहचवण्याचे काम करायला सुरुवात केली. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही आता आमचा व्यवसाय डिजिटल बनवत आहोत. डिजिटल डेटाचा वापर करून व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी आम्ही व्हॉट्सअ‍प बिझनेस आणि फेसबुकचा वापर करत आहोत आणि आमचा व्यवसाय पुढे वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहोत.”


माणदेशीच्या विविध उपक्रमाबाबत माहिती देताना रेखा कुलकर्णी म्हणाल्या

‘माणदेशी फौंडेशन’ ही  संस्था ग्रामीण व  भागातीलही महिला सबलीकरणासाठी व्यवसाय प्रशिक्षण देणारी संस्था आहे. माणदेशी सध्या भारतातल्या महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यात कार्यरत आहे. चेंबर ऑफ कॉमर्स च्या माध्यमातून माणदेशी नेहमीच छोट्या उद्योगांनाड कार्यरत ठेवण्यासाठी आणि व्यवसाय वाढीसाठी मदत करते.


आजपर्यंत सहा लाख महिलांनी माणदेशी फाऊंडेशन तर्फे व्यवसाय प्रशिक्षण घेऊन आपले व्यवसाय सुरु केले आहेत आणि हे व्यवसाय वाढवलेदेखील आहेत.


शासकिय मदत व प्रशिक्षण संदर्भात माहिती देताना वनिता शिंदे म्हणाल्या कोव्हिड १९ या साथीच्या रोगाला रोखण्यासाठी २३ मार्च’ रोजी देशभर कडक निर्बंध लावण्यात आले, त्यात महिला लघुउद्योजिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान तर झालेच पण, इतरही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी माणदेशी फौंडेशनने मदतीचा हात पुढे केला, त्यांना व्यवसाय प्रशिक्षण व व्यवसाय वाढीसाठी लागणारे सर्व सहकार्य देण्याचे ठरवले. त्यात काही शासकीय मदत, प्रशिक्षणे व इतर मदतीचा समावेश केला. जेणेकरून महिला लघुउद्योजिकांना त्यांचा व्यवसाय टिकवण्यासाठी व सुरळीत चालवण्यासाठी मदत होईल. याबरोबर ‘माणदेशी फाऊंडेशन’ मध्ये आर्थिक साक्षरता तसेच डिजिटल आर्थिक साक्षरतेचा रोजच्या व्यवहारात कसा वापर करावा याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. गुगल च्या कर्मचाऱ्यांनीही यात सहभाग नोंदवत त्यांच्याकडील आधुनिक तंत्रज्ञान व वेळ देवून या महिला लघुउद्योजिकांच्या कौशल्यात वाढ करण्याचे ठरवले आहे. 
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya