महेश मांजरेकरांना ३५ कोटींच्या खंडणीसाठी मेसेज, दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


 


स्थैर्य, मुंबई, दि. २७ : अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशी चौफेर कामगिरी करणाऱ्या प्रसिद्ध अशा महेश मांजरेकर यांना काल रात्री खंडणी मागणारा धमकीचा मेसेज मोबाईलवर आला आहे. याबाबत दादर पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा दाखल केला.


दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, रात्री मांजरेकर यांना 35 कोटींची खंडणी मागणारा मेसेज आला, त्यांनतर त्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आता या पुढील तपास गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक तपास करत आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya