दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

 खा.राजू शेट्टी यांचे सह स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर


स्थैर्य, सातारा, दि. २२ : दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जनावरासह धडक मोर्चाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजन करण्यात आले असून शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी या मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याचे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.


खा. राजु शेट्टी याचे नेतृत्वाखाली उद्या १२.वा बाॅम्बे रेस्टॉरंट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय सातारा अशा मार्गाने हा मोर्चा जनावरांसह निघणार असून या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांनी सर्व पदाधिकारी शेतकरी बांधवानी येताना मास्क लावून येण्याचे सर्वाना आवाहन केलं आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना येताना आपली जनावरे, बैलगाडी, टॅक्टर ज्यांना जे शक्य आहे ते घेऊन मोर्चास यायचे असून सर्व डेअरी चालक, मालक दूध संकलन करणारे आणि जे या व्यवसा यावर उपजिवीका करतात त्या ग्रामीण, शहरी व शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावांनी व इतरांनी एक दिवस शेतकऱ्यांसाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post