जिल्हाधिकारी महोदय, नॉन कोव्हीड पेशंट रस्त्यावर मरू द्यायचे का ? : डॉ. जे. टी. पोळ


स्थैर्य, फलटण : येथील डॉ. जे. टी. पोळ यांचे निकोप हॉस्पिटल हे सील केलेले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार कोव्हीड साठी निकोप हॉस्पिटल हे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. सध्या सगळीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे त्या मुळे खाजगी हॉस्पिटल प्रशाशनच्या ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. फलटण येथील डॉ. जे. टी. पोळ यांचे निकोप हॉस्पिटल हे नुकतेच अधिग्रहण केलेले आहे. फलटण येथे तातडीची सेवा देणारे निदान एक तरी हॉस्पिटल चालू ठेवावे अशी मागणी सध्या नागरिकांमधून होत आहे. या बाबत काही फलटण मधील काही रुग्ण आल्यावर निकोप हॉस्पिटल मध्ये रुग्ण घेत नसल्याने त्यांनी हॉस्पिटलच्या गेट समोरच कालवा सुरु केला व जिल्हाधिकारी महोदय, पेशंट रस्त्यावर मरू द्यायचे का ? असे विविध सवाल निकोप हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. जे. टी. पोळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.  


या बाबत डॉ. जे. टी. पोळ म्हणाले कि, बळाचा वापर करून आमचे हॉस्पिटल हे ताब्यात घेतले आहे. अत्यावश्यक सेवेसाठी फलटण मध्ये एक हॉस्पिटल नॉन कोव्हीड ठेवणे गरजेचे आहे. जिथे जीव वाचवण्याचे काम केले जाईल असे हॉस्पिटल प्रशाशनाने ठेवावे. सध्या कोरोना काळात लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये मी पण जावून पेशंट ना ट्रीट करतो. सगळी हॉस्पिटल अधिग्रहण करणे चुकीचे आहे. तालुक्याच्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नॉन कोव्हीड म्हणून ठेवणे गरजेचे आहे. जर शासनाने आम्हाला परवानगी दिली तर आम्ही अत्यावसेवक सेवा २४ तास सुरू ठेवू व रुग्णांची सेवा करू. कोरोनाच्या सुरवातीच्या काळात जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्या विनंतीला मान देवून ५० बेडचे कोव्हीड रुग्णालय सुरु करण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे व या पुढेही सहकार्य कायम करणार आहोत.  


कोव्हीड रुग्णालयासाठी नर्सिंग कॉलेजची इमारत सुरवातीला पहिली होती. त्या नंतर शिंगणापूर रोडला कोरोना रुग्णालय सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर त्यासाठी निकोप हॉस्पिटलने सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे. सरकारी रुग्णालांमध्ये आम्ही सद्य स्थितीत सेवा देतच आहोत व ह्या पुढी सेवा देण्यास कायम तत्पर राहू. आमचे हॉस्पिटल अधिग्रहण करताना कुठलाही निकष लावला नाही. आमच्या इथे मी एकच फिजिशियान आहे. रहिवाशी कॉम्प्लेक्स मध्ये कोरोना रुग्णालय करणार का ? नॉन कोव्हीड असलेल्या रुग्णांचा फलटणमध्ये पाच तालुक्याभार येत असतो. गरीब रुग्णांना आम्ही मोफत उपचार करतो. जर महात्मा फुले योजनेत बसत नसतील तर त्यांना हि आपण मोफत उपचार करीत असतो. त्या मुळे आमचे हॉस्पिटल नॉन कोव्हीड पेशंट साठी चालू ठेवण्यात यावे एवढीच आमची विनंती आहे. 

- डॉ. जे. टी. पोळ,

निकोप हॉस्पिटल, फलटण