चालू वर्षाचा संकरित कर व नगरपालिकेच्या गाळ्याचे भाडे पालिकेने माफ करावेत : तुकाराम गायकवाड


स्थैर्य, फलटण : गेल्या चार महिन्यांपासून फलटण संपूर्ण जगामध्ये कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. अशा मध्ये सर्वसामान्य नागरिकांना आपल्या घराचा कर भारत येणे शक्य नाही. सर्वांचे उत्पन्नात ठप्प झालेले आहे. त्यामुळे फलटण नगर परिषदेने पुढाकार घेऊन सर्व घरांचा संकरित कर व नगरपालिकेच्या गाळ्यांचे व फिरता परवाना असणाऱ्या गाड्यांचे भाडे माफ करावे, अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते तुकाराम गायकवाड यांनी केलेली आहे.

कोरोना या महाभयंकर आजारामुळे गेले चार महिने सर्व उद्योग धंदे, छोटे-मोठे कारागीर, हातगाडीवाले, टपरीधारक, भाजीविक्रेते, रिक्षाचालक व इतर सर्व लहान-मोठी दुकाने बंद होती. तसेच कारागीर क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार यांना कोरोनाचा मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सद्यस्थितीला उपासमारीची वेळ आलेली असून अश्या परिस्थिती मध्ये नगरपालिकेने सर्वांचे संकरित कर, नगरपालिकेचे असणाऱ्या गाळ्याचे भाडे व फिरता परवाना असणाऱ्या गाड्यांचे भाडेमाफ करावे, असेही गायकवाड यांनी निवेदनामध्ये स्पष्ट केलेले आहे.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.