करंडी येथे एकास मारहाण; चौघांना अटक 

स्थैर्य, सातारा, दि. 22 : करंडी, ता. सातारा येथे एकास वाड्यात यायचे नाही, असे म्हणून धक्काबुक्की करून कानाखाली मारल्याप्रकरणी चौघाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत प्रवीण जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, कमलाकर शंकर जाधव, विकी दत्तात्रय जाधव, गणेश श्रीधर जाधव, पांडुरंग जाधव सर्व रा. करंडी, ता. सातारा यांनी फिर्यादीच्या घरासमोर येवून वाड्यात यायचे नाही असे म्हणत त्यांना दमदाटी व धक्काबुक्की केली. तसेच विकी जाधव याने कानाखाली मारली तर गणेश जाधव याने काठीने पाठीवर व दंडावर मारले. पांडुरंग जाधव यांनी शिवीगाळ केली. याप्रकरणी चौघाजणांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


Previous Post Next Post