निनाम येथे एकाची गळफास लावून आत्महत्या

 स्थैर्य, सातारा, दि. ११ : सातारा तालुक्यातील निनाम येथील हमराज मौला मुजावर (वय ५०) यांनी निनाम येथील आपल्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. निनाम येथील मन्सूर मुजावर हे आपल्या शेतात काम करत होते. त्यावेळी त्यांची सातारा येथे राहणारी भावजय फरीदा हमराज मुजावर यांनी त्यांना फोन करून आपले पती हमराज मुजावर गावी आले आहेत का? असे विचारले. त्यानंतर मन्सूर मुजावर यांनी हमराज मुजावर यांच्या घरी जाऊन पाहिले असता किचनमध्ये फॅनच्या हुकास दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. त्यांनी तातडीने ही गोष्ट निनामचे पोलीस पाटील यांना कळवली तसेच बोरगाव पोलीस स्टेशन येथेही फिर्याद दाखल केली. पुढील अधिक तपास रामचंद्र फरांदे करत आहेत.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya