यादोगोपाळ पेठेत एकाची आत्महत्या

 स्थैर्य, सातारा, दि. ११ : येथील यादोगोपाळ पेठेत राहणार्‍या शरद शामराव पवार (वय 23) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली.


याबाबत अधिक माहिती अशी, शरद हा लग्नसमारंभामध्ये वाडप्याचे काम करत होता. यादोगोपाळ पेठेमध्ये तो एकटाच भाड्याने खोली घेऊन राहात होता. सोमवारी दुपारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. शरदचे आई-वडिल आणि भाऊ पुण्यामध्ये वास्तव्यास असून, घटनेची माहिती त्यांना देण्यात आल्यानंतर ते तत्काळ सातार्‍यात आले. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya