दुचाकी अपघातात एकजण ठार

 स्थैर्य, सांगली, दि. २० : पुणे-बेंगलोर द्रुतगती महामार्गावर दुचाकी अपघातात कासेगाव येथील संजय यल्लापा बनसोडे हे जागीच ठार झाले. तर सहाय्यक पोलीस फौजदार गणेश झाजरे(भवानीनगर) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात आज,गुरुवारी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.


झाजरे हे मोटारसायकल क्रमांक (एमएच१०एजे ८३४६) वरुन घरी भवानीनगरला चालले होते. ते शिराळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दरम्यान बनसोडे हे पाठीमागून मोटारसायकल क्रमांक (एमएच ०९ऐजे ४३९) वरुन कासेगावकडे निघाले होते. त्यांच्या दुचाकीची पाठीमागून जोराची धडक बसली. धडक इतकी जोराची होती की बनसोडे हे जागीच ठार झाले. तर झाजरे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.या अपघाताची कासेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.


Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.