ओरिफ्लेमचे हेअरएक्स ॲडव्हान्स्ड केअर स्टाइलस्मार्ट

 


स्थैर्य, मुंबई, २४ : भारतातील थेट विक्री करणारा अग्रेसर स्विडीश ब्रँड, ओरिफ्लेम हा तुम्हाला मोकळेपणाने व्यक्त होण्याची परवानगी देताना सुंदर दिसणे तसेच सुंदर बनवणारी उत्पादने तयार करण्यावर विश्वास ठेवतो. ब्रँडने 'हेअर एक्स ॲडव्हान्स्ड केअर स्टाइल स्मार्ट' ही नवीन श्रेणी बाजारात आणली आहे. ही उच्च कार्यक्षमता, वापरण्यास सोपी, आधुनिक फॅशन करण्यास मदत करणारी तसेच काही मिनिटात ट्रेंडी हेअरस्टाइलसाठी मदत करणारी कीट आहे. स्टायलिश केसांना सलूनमध्ये काही तास घालवण्याची गरज नाही. हेअरएक्स अॅडव्हान्स्ड केअर स्टाइलमेंटद्वारे महिला विविध परिस्थिती, मूड किंवा वेळेत विविध हेअर स्टाइलचे प्रयोग करण्यास सक्षम होतात.


या श्रेणीत हेअर एक्स ॲडव्हान्स्ड केअर स्टाइलस्मार्ट स्टायलिंग हेअर मूस आणि हेअर एक्स ॲडव्हान्स्ड केअर स्टाइलस्मार्ट शाइन स्प्रे यांचा समावेश आहे. प्रतिष्ठित फ्लेक्झीस्टे टेक्नोलॉजीसह तयार केलेल्या या उत्पादनात केसांची मुळांना संरक्षण आणि पोषण देणारी जीवनसत्त्वे आहेत. ही उच्च कार्यक्षमतेची रेंज तुम्हाला काही वेळातच वेगवेगळ्या केसांच्या ट्रेंडमध्ये कुशल बनवेल.


स्मार्टस्टाइल स्टायलिंग मूस केसांची घनता वाढवते, नव्याने कुरुळेपणा आणते तसेच मऊपणा आणून ते त्यांना झुबकेदार बनवतात. दीर्घकाळ टिकणारे, ब्रशेबल होल्ड असेलेले मूस केसांना कधीही कोरडे होऊ देत नाही. स्टाइल स्मार्ट शाईन स्प्रे अंतिम टच देते, याद्वारे २४ तास टिकणारी चमकदार फिनिशिंग मिळते. सोयाबिन तेल आणि फ जीवनसत्त्वाने युक्त असलेले हे उत्कृष्ट रेशमी, चमकदार केस देतात. हे यूव्ही फिल्टरप्रमाणेही कार्य करते, जेणेकरून तुमचे केस कधीही उदास वाटणार नाहीत.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya