कृषीकन्यांकडून माळेवाडीत वृक्षारोपण

स्थैर्य, फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण येथे  बी. एस्सी हॉटि्ॅक्ल्चर 4 थ्या वर्षात शिक्षण घेत असलेली कृषीकन्या कु. मेघा दत्तात्रय जाधव हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत माळेवाडी (सांगवी) ता. फलटण येथे वृक्षारोपन करून वृक्षारोपणाचे महत्तव ग्रामस्थांना पटवून सांगितले.

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर ,कार्यक्रम अधिकारी प्रा. अमितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या कु. मेघा दत्तात्रय जाधव हिने माळेवाडी (सांगवी) ता. फलटण येथील भैरवनाथ मंदिर या परिसरात पारिजातक,कन्हेर,कडूनिंब, चिंच यासह फुल झाडांचे वृक्षारोपन करून ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व  संगोपन आवश्य असल्याचे महत्तव पटवून सांगितले.

कार्यक्रमास श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपट जाधव,राजाराम बेलदार, सुनील बेलदार,दत्तात्रय जाधव, तसेच उपसरपंच दिनानाथ बेलदार यांच्यासह माळेवाडी (सांगवी) येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya