फलटण मधील खाजगी हॉस्पिटल्स कोरोना उपचारांसाठी अधिग्रहित : शिवाजीराव जगताप


स्थैर्य, फलटण : फलटण शहरातील व तालुक्यातील कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी शहरातील खाजगी हॉस्पिटल्स हे कोरोना म्हणजेच कोव्हीड १९ च्या उपचारांसाठी अधिग्रहित करण्यात आलेले आहेत. उपजिल्हा रुग्णालयांसह लाईफ लाईन हॉस्पिटल, साई हॉस्पिटल व लाईफ लाईन हॉस्पिटल ही कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिग्रहित केले आहेत. या पूर्वी शहरातील निकोप व सुविधा हि रुग्णालये अधिग्रहित करण्यात आलेली आहेत. अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली. 


जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. व त्यातील पोटकलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. आणि ज्याअर्थी, आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत् कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. सातारा जिल्हयातही सद्यस्थितीत मोठया प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण आढळत असून, कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यूचे प्रमाणातही मोठया प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. 


सदर संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती सातारा जिल्हयात उदभवू नये यासाठी पूर्वतयारी करणे अगत्याचे झाले आहे. जिल्हाधिकरी शेखर सिंह यांनी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केलेले आहेत. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अत्यावश्यक सेवेसाठी फलटण शहरातील विविध हॉस्पिटल्स हे हॉस्पीटल कोव्हीड 19 बाधित रुग्णांवर उपचार करणेसाठी सदर हॉस्पीटल मधील चल अचल साहित्यासह कार्यरत असणारा सर्व स्टाफसह अधिग्रहीत करण्यात येत आहे. सदरचे हॉस्पिटल्स हे डेडीकेटेड कोव्हीड रुग्णालय म्हणून घोषीत करणेत येत आहेत. तरी हॉस्पिटल प्रशाशनाने सुसज्ज असा विलगीकरण कक्ष तयार करावेत. सदर विलगीकरण कक्षामध्ये अतिदक्षता विभागातील खाटांचा समावेश करणे बंधनकारक असेल. हॉस्पीटल मधील विलगीकरण कक्षात आवश्यक ते व्हेंटिलेटर व इतर आवश्यक यंत्रसामुग्रीची तात्काळ तयारी करुन, विलगीकरण कक्ष (Isolation Facility) सुसज्ज ठेऊन Throat Swab घेण्याची तयारी करावी. 


सदर आदेशाची तात्काळ व काटेकोरपणे अंमलबजावणी करणेची आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी करणेस विलंब अथवा टाळाटाळ केलेस संबंधित हॉस्पिटल विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये पुढील कठोर कारवाई करणेत येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. 

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.