पंजाब भारत-पाकिस्तान सीमेवर पाच घुसखोर ठार

 स्थैर्य, दि. २२ : भारतार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी ठार केलं आहे. पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमारेषेवर ही कारवाई करण्यात आली. घुसखोर सीमारेषा पार करुन भारतात शिरण्याचा प्रयत्न करत असतानाच बीएसएफच्या जवानांनी त्यांना पाहिलं. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत घुसखोर ठार झाले. बीएसएफकडून ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे.


बीएसएफच्या १०३ बटालियनच्या जवानांनी पहाटे ४.४५ वाजता ही कारवाई फत्ते केली. भारत - पाकिस्तान सीमेजवळ डल सीमा चौकी भागात काही संदिग्ध हालचाली या जवानांच्या लक्षात आल्या. त्यानंतर त्यांनी गोळीबार केला. घुसखोरांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आलेत.


अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जवानांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता घुसखोरांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर जवानांकडूनही प्रत्युत्तर देत गोळीबार करण्यात आला. यावेळी झालेल्या गोळीबारात पाच घुसखोर ठार झाले.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.