जुगार अड्डयावर छापा

 स्थैर्य, सातारा, दि. २० : शहर व परिसरात दोन ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकून एक हजारांची रोकड जप्त केली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गोडोलीमधून अजिंक्यताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू होता. या ठिकाणी शहर पोलिसांनी ५१० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी शाहीद शब्बीर सय्यद (वय २२, रा. प्रतापगंज पेठ, सातारा), समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी कारवाई केसरकर पेठेतील पाण्याच्या टाकीजवळ करण्यात आली. येथे ६०० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. तेथे जुगार चालविणाऱ्या सचिन रामचंद्र माने (वय २५, रा. माची पेठ, सातारा), यासिन शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. हे चौघेही पसार आहेत.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya