लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे फलटण येथे अभिवादन


स्थैर्य, फलटण : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फलटण शाखेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथील पक्ष कार्यालयात मध्ये अभिवादन करण्यात आली यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या फलटण शाखेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी नगरसेवक सचिन अहिवळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव विजय येवले, मधुकर काकडे, मुन्ना शेख, संजय निकाळजे, राजू मारूडा, प्रवीण शेळके, हाजी शंकर कुरेशी, विजय भोंडवे, संजय इंगळे, सचिन गोळे, राजू काकडे, किशोर अहिवळे, तेजस काकडे, नवनाथ भोईटे, मौलाना कुरेशी यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post