कोयना धरणातून पाणी सोडण्यास पुन्हा सुरुवात, सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलले
स्थैर्य, पाटण, दि. २१ : कोयना धरण परिसरात पुन्हा पावसाला जोराने सुरुवात झाल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण प्रतिसेकंद 36 हजार 659 क्युसेक्स इतके झाले आहे. त्यामुळे गुरुवारी बंद करण्यात आलेले सहा वक्र दरवाजे शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा दीड फुटाने उचलण्यात आले आहेत. या दरवाजातून प्रतिसेकंद 9,857 तर पायथा विजय गृहातून 2,100 असे एकूण प्रतिसेकंद अकरा हजार 957 क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना तसेच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी असताना सध्या 93. 87 टीएमसी पाणीसाठा झाला आहे ावसाचा जोर वाढून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी आवक वाढल्यामुळे अजूनही दरवाजे आणखीन वर उचलून त्यातून जादा पाणी सोडण्यात येणार असल्याची शक्‍यता धरण व्यवस्थापन समितीने दिली आहे.Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.