सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण; झाले क्वारंटाईन


 


स्थैर्य, मुंबई : देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अगदी सर्वसामान्यांपासून राजकीय मंडळींना सुद्धा कोरोनाची लागण होण्याचं सत्र सुरूच आहे. अशातच सदाभाऊ खोत यांनीही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांची कोरोनाची चाचणी सकारात्मक आली आहे. त्यांची प्रकृती चांगली असून, त्यांनी स्वत: विलगीकरणात गेले आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.


त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर लिहले आहे की, 'मी कोरोनाची चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. मला कोरोनाची लक्षणे नसली तरी मी, स्वतः विलगीकरणात जात आहे. तरी आपण आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी, गणरायाच्या व आपल्या सर्वाच्या आशिर्वादाने मी लवकरच बरा होऊन, आपल्या सेवेत हजर राहिन.' असा संदेश सदाभाऊ खोत यांनी लिहला आहे.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya