साळींदर खाण्याची हाव पडली महागात, पोलिसांनी ठोकल्या बेड्या


 


स्थैर्य, कराड, दि. 30 : मसूर - हेळगाव रस्त्यावर कचरेवाडी जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत अवस्थेत पडलेल्या साळींदर प्राण्याला खाण्याच्या उद्देशाने घरी घेऊन येणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीच्या घरात ते साळींदर पोत्यात भरून ठेवले असल्याची माहिती कराड वनविभागाला मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी छापा मारून कारवाई केली‌ आहे. शशिकांत पवार असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून अधिकाऱ्यांनी त्याची खाजगी गाडी MH-14 CX-6671 स्विफ्ट डिझायर गाडी जप्त केली आहे.


वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल ए.पी.सव्वाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, वनरक्षक प्रशांत मोहिते, वनरक्षक भारत खटावकर, वनरक्षक सुनिता जाधव, कराड शहर पोलीस स्टेशन बीट मार्शल, होमगार्ड व पंच रोहन भाटे, भाऊसो नलवडे यांनी ही कारवाई केली.


Previous Post Next Post