सर्वोदय विद्यालय सुडकोली ता. अलिबागच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
स्थैर्य, अलिबाग, दि. ३१ (प्रवीण रसाळ) : नुकताच इयत्ता दहावी महाराष्ट्र राज्य शिक्षण  मंडळाचा निकाल जाहीर झाला . यावर्षी श्री.दिनाभाई मोरे शिक्षणसंस्था सानेगावं  संचलित सर्वोदय विद्यालय सुडकोली ता. अलिबागच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले व श्री. दिनाभाई मोरे शिक्षणसंस्थेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. विद्यालयाचा निकाल 100% लागला असून कुमारी प्रणिता हरिदास पाटील 89.20%  प्रथम, कुमारी वैष्णवी विलास पाटील 88.40%  द्वितीय तर कु. ओम काशिनाथ पाटील 87.80% व कु. तन्मय दत्ताराम पाटील 87.80% यांनी  तृतीय येण्याचा मान पटकावला.

संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, उपाध्यक्ष जीवनशेठ पाटील, सचिव मनोहर मोरे, खजिनदार मोहनशेठ ठाकूर, कायदेविषयक सल्लागार अँड. विवेक मोरे, संस्थेचे ज्येष्ठ संचालक अनंतराव पाटील, सर्वोदय विद्यालय सुडकोलीचे अध्यक्ष जनार्दन ठाकूर, खजिनदार दत्ताराम ठाकूर,  ज्येष्ठ संचालक शंकरराव तांबडकर, सर्वोदय विद्यालय सुडकोलीचे सर्व संचालक ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी यांनी विद्यालयाचे  प्रभारी मुख्याध्यापक शिंदे संजीव चंद्रकांत, गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
Previous Post Next Post