वावरहिरे उपसरपंचपदी सुरेश काळे यांची निवड

 



स्थैर्य, वावरहिरे, (अनिल अवघडे) : माण तालुक्यातील राजकियदृष्ट्या महत्वपुर्ण  समजल्या जाणार्‍या वावरहिरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेश छगन काळे यांची बहुमताने निवड झाली.तुकाराम जाधव यांचा उपसरपंच पदाचा नियोजित कालावधी पुर्ण झाल्याने  या पदावर इतरांना काम करण्याची संधी मिळावी,म्हणुन  त्यांनी आपल्या पदाचा स्वखुशीने राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सरपंच चंद्रकांत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवड प्रकिया राबवण्यात आली. यावेळी विरोधी पक्षाकडुन मल्हारी जाधव यांनी अर्ज दाखल केला. या निवड प्रक्रिया वेळी अकरापैकी आठ सदस्य उपस्थित होते. तीन सदस्य गैरहजर राहिले. एकुणच उपस्थित सभासदाच्या गुप्त मतदान पध्दतीने  ही निवड प्रक्रिया पार पडली. काळे यांची पाच विरुद्ध तीन अशा दोन मताच्या फरकाने निवड झाली. उपसरपंचपदी सुरेश काळे निवड झाल्यानंतर सरपंच चंद्रकांत वाघ, युवानेते संदिप अवघडे, मल्हारी जाधव व समस्त ग्रामस्थ यांच्या  हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वांना बरोबर व विश्वासात घेवुन गावच्या प्रथम मुलभुत सुविधा मार्गी लावण्याबरोबर विकासकामावर जास्तीत जास्त भर देणार असुन यामध्ये हयगय करणार नाही. गावचा विकास हाच माझा ध्यास राहणार असल्याचे  उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर काळे  यांनी सांगितले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.