साताऱ्यात खासगी हॉस्पीटलमध्ये कर्मचाऱ्याची आत्महत्या

 स्थैर्य, सातारा, दि. १७ : येथील एका खासगी हॉस्पीटलमधील कर्मचारी विजय रामचंद्र साळुंखे (वय २४, रा. बालाजी अपार्टमेंट, समर्थ मंदिर, सातारा) याने हॉस्पीटलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय साळुंखे हा साताऱ्यातील एका नामांकित हॉस्पीटलमध्ये काम करत होता. शनिवारी रात्रपाळीसाठी त्याची ड्यूटी होती. त्यामुळे तो कामावर गेला होता. रात्री साडेबाराच्या सुमारास हॉस्पीटलमधील एका खोलीत त्याने गळफास घेतला. हा प्रकार पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर रुग्णालयात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करत आहेत.

Previous Post Next Post