सुप्रीया सुळेंनी गाडी थांबवून सफाई कामगारांचे मानले आभार (पहा व्हिडिओ)

 स्थैर्य, मुंबई, दि. ०८ : मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी भरले गेले होते. तर समुद्रालाही उधाण आल्याने पाणी रस्त्यावर आले होते. मरीन लाईन्सवर समुद्राच्या पाण्यामुळे आलेला कचरा साफ करण्याचे काम सफाई कर्मचारी करत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रीया सुळे याच रस्त्याने जात असताना त्यांना भर पावसात काम करणारे हे कर्मचारी दिसले. त्यांनी गाडी थांबवून या कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. तसंच त्यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह देखील केले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya