सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल


 


स्थैर्य, मुंबई, दि. 26 : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या व्हॉट्सअप चॅटवरून तिचा ड्रग्ज डिलर्सशी संपर्क असल्याचे नुकतेच समोर आले होते. तसेच तिने सुशांतलाही ड्रग्ज सेवनासाठी प्रवृत्त केल्याचे बोलले जात आहे.


सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती संदर्भात नुकताच अंमली पदार्थ सेवनाबाबतचा नवा मुद्दा समोर आला आहे. याबाबत ईडीने रियाचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट नुकतेच सीबीआयसोबत शेअर केले होते. नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने यामध्ये ड्रग्जचा वापर आणि व्यापार झाल्याचा ठपका ठेवला होता. रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून ती एमडीएमए, हशिश आणि मारीजुना नावाचे ड्रग घेत असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर सुशांतलाही तिने याचे सेवन करण्याबाबत सूचना केल्याचे बोलले जात आहे.


दरम्यान, काल रियाच्या वकिलांनी या संदर्भात एक स्टेटमेंट प्रसिद्ध केले. यामध्ये रियाने आजपर्यंत आपल्या जीवनात कधीही ड्रग्ज घेतले नाहीत, असे म्हटले आहे तसेच रिया कधीही आपल्या रक्ताची चाचणी करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya