एनकुळ ग्रामपंचायत हद्दीत चहा टपरी अतिक्रमण वाद,दोन्ही गटातील १०जणांवर अट्रासिटी गुन्हा दाखल

 


स्थैर्य, दहिवडी, (विनोद खाडे) दि. २४ :  सद्यस्थितीत सर्वत्र कोरोना महामारी च संकट असून त्यातच गणेशोत्सव सण सुरू असताना खटाव तालुक्यातील एनकुळ गावात एक वेगळं च धुमशान झाले आहे. गावातीलच एकाने ग्रामपंचायत हद्दीत चहा टपरी टाकून अतिक्रमण केल्याच्या कारणावरून विकोपाला गेलेल्या वादाने दोन्ही गटातील सुमारे १०जणांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा, अट्रासिटी अंतर्गत वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की एका गटातील फिर्यादी मुकेश वामन तुपे यांचे फिर्यादी वरून दिनांक २२/०८/२०२०रोजी सकाळी 0८/00 वाजणेचे चे सुमारास गावातील विजय अर्जुनराव खाडे याने मला चहाटपरी पत्र्याचे शेड घालण्यासाठी १००००/-रुपये मागून ते दिले नाहीतर तुला खोटया गुन्हयात अडकविन अशी धमकी दिली. तसेच संध्याकाळी ७.३० वा चे सुमारास वडूज ता खटाव गावी तहसिल कार्यालयाचे गेट समोर रस्त्यावर मी उभा असताना आमचे गावातील विजय अर्जुनराव खाडे, आबासाहेब तात्याबा खाडे अर्जुनराव रामचंद्र खाडे सर्व राहणार एनकूळ ता खटाव यांनी मी मांग जातीचा आहे हे माहित असताना त्यांनी मला आता तु कशी टपरी काढत नाही, हे आम्ही बघतो आमच्या गावात महारा-मांगाच्या टपऱ्या चालू देवू का, तू घरी ये तुला दाखवतो. तुझ घर गावात ठेवणार नाही अशी दमदाटी केली. तसेच तुझ्यावर आम्ही विनयभंगाच्या केसेस दाखल करुन तुला काय करायचे ते कर. मांगटयांनो गावात तुमची घरे किती तुम्ही किती बोलणार तुम्ही आमच्या डोक्यावर बसणार का असे जातीवाचक बोलून दमदाटी केली आहे,असा गुन्हा रजि. दाखल करणत आला आहे.


तर दुसऱ्या गटातील मौजे एनकुळ ता.खटाव गावचे हद्दीत फिर्यादी अनिल दादा जगताप यांचे राहते घरात व घरासमोर दि. २२/ ०८/ २०२० रोजी दुपारी 3.30 वा.चे सुमारास"तु गावात लय पुढारी होवुन मिरवतो या कारणावरुन फिर्यादीचे घरात येवुन त्याच्या हाताला धरुन घरातुन ओढुन बाहेर आणले व त्यास माहरड्याला लय मस्ती आली आहे याची आपण जिरवली पाहिजे तु आता गावात लय पुढारी होवुन मिरवत असतो .तुझा पुढारीपणा काढला पाहिजे असे म्हणुन हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे .तसेच अकुंश खरमाटे व दतात्रय खाडे यांनी फिर्यादीस हाताने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांनी तेथे उभे असलेल्या मुकेश वामन तुपे, रविंद्र बाबासो खाडे, रोहित अर्जुन खाडे, अर्जुन शंकर खाडे, गणेश जयराम सुर्यवंशी या सर्वाना बोलावुन घेवुन म्हणाले की, या म्हारडयांना गावात राहुन लय पैशाचा माज आला आहे. त्यांना गावात राहु दिले नाही पाहिजे त्यांना गावातुन हाकलुन दिले पाहिजे .असे म्हणुन त्या सर्वानी फिर्यादीस मारहाण केली .फिर्यादीच्या औरडण्याचा आवाज ऐकुन शेजारी राहणारे अर्जुन भालेराव व चंद्रकांत सकट तसेच गावातील भाऊसो खाडे, जयवंत खाडे, शकील मुजावर, चंद्रहार पाटील व के राजाराम खाडे, यांनी तेथे येवुन भांडणे सोडवा सोडव केली त्या नंतर अंकुश श्रीपती खरमाटे व त्याचे सोबत दत्तात्रय बाबासो खाडे, रविंद्र बाबासो खाडे, रोहित अर्जुन खाडे, अर्जुन शंकर खाडे हे तेथुन पळुन गेले म्हणुन माझी अकुंश श्रीपती खरमाटे, दतात्रय बाबासो खाडे, मुकेश वामन तुपे, रविंद्र बाबासो खाडे, रोहित अर्जुन खाडे, अर्जुन शंकर खाडे, गणेश जयराम सुर्यवंशी रा.एनकुळ ता.खटाव जि.सातारा यांचे विरुद्ध फिर्याद आहे म्हणुन वगैरे मजकुरचे खबरीवरुन गुन्हा रजि.दाखल करणेत आला आहे.


सदर गुन्हयाचा तपास माण खटाव उपविभागीय पोलिस अधिकारी बी बी महामुनी करत आहेत. Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya