चोराडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने केलेल्या ग्रामसभेच्या बनावट कागदपत्राची सखोल चौकशी करुन निलंबनाची कारवाई करावी : ग्रा. पं. सदस्य श्रीकांत पिसाळ

 स्थैर्य, पुसेसावळी दी. 20 (विनोद खाडे) : चोराडे  (ता-खटाव) येथील  ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व्हि .आर .कांबळे हे ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार करत आहेत. या ग्रामसेवकांनी दि 01-02-2020  रोजीची तहकूब ग्रामसभा कागदोपत्री दाखवून बनावट सभावृत्त तयार केले आहे. संबंधित सभेची पूर्वसूचना ग्रामस्थांना देण्यात आली नव्हती. सुचने बाबतचे कोणतेही रेकॉर्ड विषयात नमुद ग्राम सेवकांकडे नाही. 


तसेच 14 व्या वित्त आयोगातील 10 लक्ष व ग्रामनिधीतून  5 लक्ष असा साधारणपणे 15 लक्ष निधी ची तरदूत करण्याची आहे. तेव्हा ग्रामनिधीतील 5 लक्ष रुपये निधी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्याने तो उपलब्ध करण्यासाठी  दि-18-08-2020 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायतीसमोर गाळ्यांची जाहीर सोडत काढून सदर निधी अपहरित करण्याच्या उद्देशाने ग्रामसेवक यांनी स्वतःच्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करत, वर नमूद केलेली ग्रामसभा दर्शवलेली आहे. नमूद ग्रामसेवक यांच्याकडे ग्रामसभेच्या अनुषंगाने उपलब्ध असलेल्या कागदपत्रांमध्ये ग्रामस्थ हजर रजिस्टर व सभावृत्तांत यात बनावट व्यक्तीच्या नावाचा समावेश आहे. नावासमोर हजेरी दाखल केल्या गेलेल्या स्वाक्षर्‍या त्या त्या व्यक्तीच्या नाहीत, या सर्व बाबी संबंधित ग्रामसेवकांनी नमूद केलेला निधी अपहरीत करता यावा या उद्देशाने केलेले आहे. 


तरी त्यांच्या विरुद्ध निलंबनाच्या कारवाई सह झालेल्या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी. व दि-18-08-2020 रोजी झालेली जाहीर सोडत रद्द करण्यात यावी.तसेच दि.01/02/2020 रोजीचा संबंधित ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव रद्द करावा  अशी मागणी सातारा जिल्हा परिषदेचे स्थायी अध्यक्षांकडे केलेली आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.