दि कराड अर्बन बॅकेंच्या फलटणच्या सुरक्षारक्षकांनी दाखवला प्रामाणिकपणा

स्थैर्य, फलटण : येथील दि कराड अबॅन बॅकेंमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजेंद्र कांबळे यांना बँकेच्या परिसरात एक लाल रंगाचे पॉकेट आढळून आले. सदरचे पॉकेट त्यांनी तात्काळ शाखा व्यवस्थापक दिपक फाळके यांच्या ताब्यात दिले. दिपक फाळके यांनी बँकेतील अधिकारी राहित भांडवलकर यांच्यामार्फत पाकीटाची तपासणी केली असता सदरचे पाकीट तुषार मुळीक यांचे असल्याचे लक्षात आले. या पाकीटामध्ये रोख रककम, ए.टी.एम. कार्ड, पॅन कार्ड यासह महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यानंतर तुषार मोहिते यांच्याशी संपर्क करुन त्यांना सदरचे पॉकेट देण्यात आले. 

या प्रामाणिकपणाबद्दल राजेंद्र कांबळे व बँक अधिकारी व कर्मचार्‍यांचे तुषार मुळीक यांनी आभार मानले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya