लोणंद येथे रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयांत राष्ट्रीय शिक्षणाची कवाडे उघडी करावीत - साथ प्रतिष्ठाण

 स्थैर्य, लोणंद, दि. १८ : आशिया खंडातील सर्वात मोठ्या यशस्वी शिक्षण संस्थेचा मान रयत शिक्षण संस्थेस आहे. लोणंद व पंचक्रोशीत सर्व सामान्य जनतेला रयत शिक्षण संस्थेबाबत आदराची भावना आहे. काळाची पावले ओळखून स्पर्धेच्या युगात मुल्यवर्धक स्पर्धात्मक शिक्षणाची गरज पाहता विविध क्षेत्रातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परिक्षेमधील ग्रामीण व निमशहरी भागातील टक्का वाढवणेकामी व लोणंद व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना सुकर व यशस्वी जिवणाची वाटचाल करणेकामी लोणंद येथील रयत शिक्षण संस्थेतर्फे येथील विद्यालयांत सी.बी.एस.सी. सलग्न अंतर्गत शिक्षण अभ्यासक्रम सुरू करुन विद्यार्थ्यांना गुणात्मक, मुल्यवर्धक इंग्रजी माध्यमाचे पुर्व प्राथमिक वर्षापासून ते इयत्ता 10 वी पर्यंतचे शैक्षणिक दालन उपलब्ध करून राष्ट्रीय शिक्षणाची कवाडे उघडी करावीत. अशी मागणी साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष /सचिव यांना मालोजीराजे विद्यालय लोणंदच्या मुख्याध्यापिका मा. सौ.सुनंदा नेवसे मॅडम यांचे द्वारा निवेदनाद्वारे केली यावेळी साथ प्रतिष्ठाण चे सचिव मंगेश माने, उपाध्यक्ष दिपक बाटे, खजिनदार सचिन चव्हाण उपस्थित होते.

Previous Post Next Post