मायणी येथील अभयारण्य ठिकाणी मोठा प्रोजेक्ट करण्याचा विचार-डॉ बेन क्लेमेंट

 

मायणी येथील अभयारण्य पहाणी करताना मुख्य वन संरक्षक डॉ क्लेमेंट, जिल्हा उपवनसंरक्षक डॉ भारत सिंग हाडा,डॉ येळगावकर आदी स्थैर्य, खटाव, दि. २१ (विनोद खाडे) : माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी मायणी पक्षी आश्रयस्थान याठिकाणी आणलेल्या निधीतून झालेल्या कामास पुन्हा उजाळा. पाच जिल्ह्यांचे वनविभाग प्रमुख डॉ बेन व्ही. क्लेमेंट (मुख्य वन संरक्षक) व सातारा उपवनसंरक्षक डॉ भारतसिंग हाडा यांची मायणी पक्षी आश्रयस्थानास भेट. वन व पक्षी संवर्धनाचा मोठा प्रोजेक्ट याठिकाणी निर्माण करण्याचा विचार वनविभाग व शासनाचा असल्याची दिली मुख्य वन संरक्षक डॉ बेन व्ही क्लेमेंट यांनी माहिती दिली. स्थानिक युवकांच्याकडून झालेल्या कामाचेही केले कौतुक केले. यावेळी माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर, मायणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आनंदा शेवाळे, उपसरपंच सुरज पाटील, दादासो कचरे, ग्रामपंचायत सदस्य रंजित माने. डॉ श्यामसुंदर मिरजकर, राज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजाराम कचरे, उपाध्यक्ष सतीश डोंगरे, संजय गुदगे, तालुका वन अधिकारी शीतल फुंदे, वनपाल शिंदे, वनरक्षक खाडे, जेष्ठ पत्रकार प्रकाश सुरमुख, पोपट मिंड, अंकुश चव्हाण, महेश जाधव, श्रमदान करणारे युवक सुरज माळी, शुभम माळी, श्रीकांत सुरमुख आदी यावेळी उपस्थित होते.Previous Post Next Post