दहिवडी पोलीस दलातील राजाच्या भुजात ३२ गावांचे बळ


दहिवडी येथे आयोजीत गणेश मंडळांच्या बैठकीत आवाहन करताना स.पो.नि. राजकुमार भुजबळ.स्थैर्य, म्हसवड दि.१९ (महेश कांबळे) : कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयाचा प्रमुख हा त्या कार्यालयाचा राजा असतो त्या कार्यालयात त्या राजाचाच आदेश चालतो वा त्या राजाच्या आवाहनाला प्रतिसादही त्या कार्यक्षेत्रातील सामान्य जनता देते हे दहिवडी पोलीस दलाने दाखवुन दिले असुन या दलाच्या राजाने केलेल्या आवाहनाला हद्दीतील ३२ गावाने एकमुखी पाठींबा दर्शवत आपल्या गावात एक गाव एक गणपती बसवण्याचा निर्णय घेत पोलीस दलाचा सन्मान जिल्ह्यात वाढवताना या दलाच्या प्रमुखाच्या भुजात ३२ गावचे बळ दिल्याचे अधिरोखीत केले आहे.


कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर यंदा होवु घातलेला गणेश उत्सव अत्यंत साधे पध्दतीने करण्याबरोबरच प्रत्येक गावाने एक गाव एक गणपती बसवावा यासाठी जिल्हा पोलीस व प्रशासन प्रयत्न करीत असुन त्यांच्या या प्रयत्नाला माण तालुक्यात चांगलेच यश मिळत असल्याचे दिसुन येत आहे, म्हसवड व दहिवडी ही तालुक्यातील दोन महत्वाची पोलीस स्टेशन असुन या पोलीस स्टेशन हद्दीतील जास्तीत जास्त गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी यासाठी दोन्ही पोलीस स्टेशन कडुन निकराचे प्रयत्न सुरु असुन त्यासाठी दोन्ही स्टेशन च्या प्रमुखांनी गावोगावी बैठका घेत ग्रामस्थांना आव्हान करताना दिसत आहेत. पोलीसांच्या या आवाहानला अनेक गावांनी सकारात्मक प्रतिसाद देत यंदाचा गणेशोत्सव हा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा एकमुखी निर्णय घेत पोलीसांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट जरी असले तरी गणेश उत्सव हा होणारच आहे. श्री गणेश ही बुध्दीची देवता मानली जात असली तरी तो विघ्नहर्ता म्हणुनही ओळखला जातो त्यामुळे यंदा संपुर्ण जगासमोर विघ्न निर्माण करणार्या कोरोनाचा सर्वनाश हा विघ्नहर्ताच करु शकतो ही भावना सर्व गणेश भक्तांमध्ये असल्यानेच कोरोनाच्या या महामारीतही गणेश भक्तांचा उत्साह कायम आहे. मात्र गणेश उत्सव साजरा करताना आपणही प्रशासनाला सहकार्य करुन या महामारी ला आपल्या गावापासुन दुर ठेवायचे असा दृड निश्चय गावोगावी होत असलेल्या बैठकीतुन व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील जास्तीत जास्त गावात एकच गणपती बसवावा यासाठी पोलीस व प्रशासन प्रयत्न करीत आहेत. माण तालुक्यात दहिवडी पोलीस स्टेशन ने यामध्ये बाजी मारत ३२ गावात एक गाव एक गणपती बसवण्याचे जाहीर केले असुन ये - त्या दोन दिवसात हा आकडा आणखी काही वाढण्याची शक्यता या दलातील पोलीस कर्मचार्यांकडुन व्यक्त होत आहे. दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रमुख असलेले राजकुमार भुजबळ हे यासाठी खुप प्रयत्नशिल आहेत त्यांच्या या प्रयत्नामुळेच दहिवडी सारख्या महत्वाच्या शहरातही एकच गणपती बसवण्याचा एकमुखी निर्णय नागरीकांनी घेतला आहे, अर्थातच भुजबळ यांच्या या प्रयत्नाला दहिवडीतील राजकिय, सामाजीक व सुजान नागरीकांची साथ ही तितकीच मोलाची लाभल्यानेच हे शक्य झाले असले तरी दहिवडी सोबत इतर ३१ गावांनीही असाच निर्णय घेत पोलीस दलाचे बळ वाढवल्याचे दिसुन येते. दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ६५ गावे येत असुन या गावात कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम स.पो.नि. राजकुमार भुजबळ हे चोखपणे बजावण्याचे काम करीत असल्यानेच या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ५० टक्के गावांनी पोलीस अधिकारी असलेल्या भुजबळ यांच्या भुजात बळ भरण्याचे काम केले असुन माणवासियांनी भुजबळ यांना दिलेले बळ निश्चीतच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अधिकचे बळ देणारे ठरणार एवढे मात्र निश्चित.

म्हसवड पोलीस स्टेशनचा श्री. गणेशा -

म्हसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत लहान - मोठी व वाड्या मिळुन ७९ गावे येतात या सर्व गावातील प्रमुखांशी म्हसवड पोलीस स्टेशन चे स.पो.नि. गणेश वाघमोडे यांनी चर्चा करुन त्यांना एक गाव एक गणपती ही संकल्पना अंमलात आणण्याचे आवाहन केले असुन यापैकी ३० गावांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने म्हसवड पोलीस स्टेशन ने ही श्री. गणेशा चांगलाच केला असल्याचे दिसुन येते.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya