रेशनिंग दुकानातील थम्सला नागरीकांचा ठेंगा
रेशनिंग दुकानात धान्यासाठी थम्स न घेण्याची मागणी


स्थैर्य, म्हसवड दि. २३ : शिधा पत्रीकेवरील धान्यासाठी ग्राहकांच्या थम्सचा वापर सुरु झाल्याने कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भिती सर्वसामान्य जनतेतुन व्यक्त होत असुन कोरोना संपेपर्यत रेशनिंग दुकानात शिधा पत्रीका धारकांचा थम्स घेतला  जावु नये असे म्हणत या थम्स प्रकियेला विरोध केला आहे. 


कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्यांना आधार असणा-या रेशनचे धान्य खरेदी साठी रेशन दुकानदारा कडुन ई- मशीनचा वापर केला जावु लागला अाहे, हा माल खरेदी करताना कार्डधारकांना आपल्या बोटाचे थम्सचा वापर करावा लागत असल्यामुळे कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका निर्माण होत आहे. 


मार्च महिन्यापासुन कोरोना संक्रमणाचा प्रवेश झाल्याचे आढळून आल्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध दिशानिर्देश जारी करण्यात आले होते, त्यामध्ये राज्य सरकारने मार्च महिन्यात परिपत्रक जारी करून रेशन दुकांनामध्ये ई-पॉस मशीन वापरण्यास मनाई केली होती त्या परिपत्रकाची मुदत वेळोवेळी वाढवण्यात आली होती त्यामुळे रेशन दुकानदार कोरोना पासुन मुक्त होते तसेच सक्रमणाचा धोका ही नव्हता परंतू ३१ जुलै नंतर ई-पॉस मशीनचा वापर बंद ठेवण्याविषयी शासनाकडुन स्पष्ट निर्देश देण्यात आले नाहित त्यात सद्या जिल्ह्यात ही कोरोणा बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना सर्वसामान्याचा जगन्याचा आधार ठरणा-या रेशन दुकानामध्ये कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे हि मशीन वापरताना दुकानदार व ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतराचे पालन होत नाही त्यामुळे कोरोनाचा धोका टळे पर्यंत ई-पॉस मशीनचा वापर करण्यात येवू नये अशी मागणी ग्राहकांतून केली जात आहे.


कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने गुरूवारी रेशन दुकानामध्ये ई-पॉस वापरण्यावर एक महिन्याकरीता स्थगिती दिली आहे तसेच कोरोनाचा धोका टळेपर्यंत हि मशीन वापरण्यास मनाई करण्यावर या एक महिन्यात योग्य निर्णय घेण्यात यावा असा आदेश ही कोर्टाने सरकारला दिला आहे.


 


Previous Post Next Post