जोशी विहीर नजीक बर्निंग कारचा थरार 

स्थैर्य, भुईंज, दि. १८ : महामार्गावर भुईंज नजीक कार जळून भस्मसात झाली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी नाही. चालकाने प्रसंगावधान राखल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.


याबाबत घटनास्थळावरून व भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजता पुण्याहून सिंधुदुर्गला निघालेल्या लॉजी  या कार चालकाला त्याच्या गाडीच्या बॉनेटमधून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्याने तातडीने आपली कार महामार्गाच्या बाजूला घेत मदतीसाठी हाका मारल्याने जवळच असलेल्या सुभद्रा पेट्रोल पंपाचे मालक अंकुश शिंदे व त्यांचे सहकारी यांनी चार ते पाच आग विझवणारे सिलिंडरसह घटनास्थळी धाव घेतली. परंतु गाडीने पेट घेतल्याने आग आटोक्यात येत नव्हती. या दरम्यान काही मिनिटातच भुईंज पोलीस स्टेशनचा फौजफाटा किसनवीर कारखान्याच्या फायर फायटर यंत्रणेसह घटनास्थळी पोहचला व आग आटोक्यात आणण्यात यश आले. या दुर्घटनेत प्रसंगावधान राखल्याने गाडीत एकमेव असलेले चालक मच्छिंद सिद्दिकी मंगा (रा. रत्नागिरी, वय 35) हे सुदैवाने वाचले. परंतु कार पूर्णपणे जळून भस्मसात झाल्यामुळे नुकसानीचा अंदाज आला नाही.
किसनवीर कारखान्याची फायर फायटर यंत्रणा व भुईंज पोलिसांचा फौजफाटा यांनी स्वतः गाडीची आग विझवण्यासाठी हातात पाइप घेवून पोलीस कॉन्स्टेबल रविराज वर्णेकऱ, हवालदार घाडगे़, दत्तात्रय धायगुडे आदीनी प्रयत्न केले. मात्र बघ्यांच्या गर्दीने मोबाईलमध्ये शूटिंग करणे, फोटो काढणे सुरू केल्याने मदत कार्यात अडथळे निर्माण होत होते.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.