बलकवडी धरणावर सेल्फी काढण्याच्या नादात युवकाने गमावला जीव

 स्थैर्य, वाई, दि. 22 : पसरणी, ता. वाई येथील 22 वर्षीय अजय विजय महांगडे या युवकाचा बलकवडी धरणावर सेल्फी काढताना पाय घसरून सांडव्यावरून पडून जागीच मृत्यू झाला. दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पसरणी येथील अजय महांगडे व 7 जण बलकवडी धरणावर फिरण्यासाठी गेले होते. दुपारी 3.30 च्या सुमारास धरणावरील सिक्युरीटी गार्ड जेवायला गेला असताना सदर युवक सांडव्या नजीक सेल्फी घेत होते. यावेळी अजय सेल्फी घेण्यासाठी सांडव्याच्या नजीक गेला. निसरड्या जागेवरून पाय घसरल्याने तो सांडव्यावरून खाली पडला. यावेळी सांडव्यातून पाण्याचा विसर्गही सुरू होता. अजयच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलीस ठाण्यास समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सांडव्यातील पाणी पूर्णपणे बंद करून स्थानिक युवकांच्या सहाय्याने रोप व ट्यूबच्या मदतीने त्याचा मृतदेह सायंकाळी 6 च्या सुमारास सांडव्यातून बाहेर काढण्यात आला. अजय हा प्लंबिंगची कामे करत होता. सुस्वभावी असल्याने त्याचा मित्र परिवार मोठा होता. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.