चौधरवाडीत कृषीदूतांकडून वृक्षारोपण

स्थैर्य, फलटण : ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण फलटण तालुक्यातील चौधरवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लावण्यात आल्याची माहिती प्रशिक्षणार्थी ऋषिकेश श्रीकांत गरड यांनी दिली. सातव्या सत्रातील विध्यार्थ्यांनी शेतकर्‍यांना प्रशिक्षण व शेती संवर्धन याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कृषिदूत ऋषिकेश श्रीकांत गरड यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौधरवाडी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पूर्ण केला. 

यावेळी चौधरवाडी गावचे सरपंच सौ.प्रतिभाताई उत्तमराव चौधरी, उपसरपंच श्री. औदुंबर कोकाटे. गावातील प्रतिष्ठित वक्ती उत्तमराव दिनकर चौधरी, छगन भिकाजी शिंदे व शिक्षक सौ.साधना चिंचकर व आशा सस्ते व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. डी. निंबाळकर, प्रा.ए. डी. पाटील व इतर सर्व प्राध्यापकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Previous Post Next Post