रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या तालुकाध्यक्षपदी संजय निकाळजे व शहराध्यक्षपदी लक्ष्मण अहिवळे यांची बिनविरोध निवड

स्थैर्य, फलटण : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या फलटण तालुक्यातील नुतन कार्यकारिणीच्या निवडी नुकत्याच जाहिर झाल्या असुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट फलटण तालुका अध्यक्ष संजय निकाळजे व फलटण शहर अध्यक्ष पदी लक्ष्मण अहिवळे यांची बिनविरोध निवड झाली असून फलटण शहर युथ अध्यक्ष पदी सागर लोंढे यांची फेरनिवड करण्यात आली.यावेळी नियुक्त पञ देऊन सन्मान करण्यात आले.यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटक मधुकर काकडे,जिल्हा सचिव विजय येवले,जिल्हा सरचिटणीस मुन्ना शेख,जिल्हा नेते राजु मारुडा आदि मान्यवर उपस्थित होते. येथील बुध्दविहार येथे हा निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला होता.


यावेळी बोलताना मधुकर काकडे म्हणाले की,नविन पदाधिकारी यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच लोकांना पक्षाची ध्येय धोरणे काय आहेत हे समाजापुढे मांडले पाहिजेत.यावेळी नविन पदाधिकारी यांचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


यावेळी मुन्ना शेख म्हणाले,नविन सर्व पदाधिकारी यांनी आता पासुनच कामाला लागुन मोठ्या प्रमाणात पक्षाचा प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे तसेच येणाऱ्या काळात पक्षाची मोठी फौज निर्माण झाली पाहिजेल असा सुतोवास केला.यावेळी सर्व नविन पदाधिकारी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार मुन्ना शेख यांनी मानले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya