वीर धरणातून नीरा नदीत ८०० क्यूसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात

स्थैर्य, फलटण : भाटघर,  वीर, नीरा-देवघर, गुंजवणी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात  झाली असून वीर धरणात पाणी साठा वाढू लागल्याने विद्युत गृहातून काल (मंगळवार) दुपारी ४ वाजले पासून नीरा नदीत ८०० क्यूसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती वीर धरण उप अभियंता विजय नलवडे यांनी दिली आहे.


मंगळवार दि. ११ रोजी सकाळी घेतलेल्या मोज मापाप्रमाणे, भाटघर धरण ६९.३०% भरले असून आज सकाळी संपलेल्या २४ तासात तेथे २२ मि. मी.पाऊस झाला असून आजअखेर एकूण ४८८ मि. मी. पाऊस झाला आहे. नीरा-देवघर ५६.३१% भरले असून तेथे ३२ मि. मी. पाऊस झाला आहे, आज अखेर एकूण १०४२ मि. मी. पाऊस झाला आहे. वीर धरण ९४.२६% भरले आहे. तेथे १७ मि. मी. पावसाची नोंद झाली असून आज अखेर एकूण ३६० मि. मी. पाऊस झाला आहे. या धरणातून नीरा नदीत ८०० क्यूसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.नीरा उजवा व डावा कालव्यातून पाणी सोडण्यात आले नसल्याचे नलवडे यांनी नमूद केले आहे. गुंजवणी धरण ८६.११% भरले असून पाणलोट क्षेत्रात २४ मि. मी. एकूण ११५६ मि. मी. पाऊस झाला आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya