निंबळकमध्ये १४ व्या वित्त आयोगातून घंटागाड्या; ग्रामपंचायतीने दिले आरोग्याला प्राधान्य

स्थैर्य, निंबळक : निंबळक गावचे सुपुत्र व डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राम निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निंबळक ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून १४ व्या वित्त आयोगातून घंटागाड्या घेतल्या आहेत. गेली ५ वर्षे नागरिकांच्या दृष्टीने विविध समाजउपयोगी उपक्रम राबवून संपूर्ण निंबळक गावचा सर्वांगीण विकास साधलेला आहे. निंबळक गावच्या सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी गावाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने काळाची गरज ओळखत घंटागाडी घेतल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya