सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होण्यासाठी हनुमान गावाच्या ग्रामस्थांची ईश्वराकडे प्रार्थना
स्थैर्य, कराड, दि. १७ : महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री, लोकनेते नामदार बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली असल्याने काल त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.


लोकनेते नामदार बाळासाहेब पाटील यांच्या तब्येतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी म्हणून हनुमानगाव ता.कराड येथे सोशल डिस्टंसिंगचे पालन करत होमहवन करण्यात आले.


नामदार साहेब लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा जनसामान्य लोकांच्या सेवेत यावे असे ईश्वराकडे साकडे घालण्यात आले.

या प्रसंगी हनुमानगाव चे आदर्श सरपंच बाळासाहेब शिंदे सरकार, रमेश अर्जुगडे,जयसिंग धर्मे, युवा नेते वैभव अर्जुगडे, नवरत्न ग्रुपचे अध्यक्ष सुंशात धनवे व सर्व सदस्य, हनुमानगाव सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील व ग्रामस्थ सोशल डिस्टंसिंगचे पालन करत हजर होते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya