जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी

 



स्थैर्य, सातारा दि. 18 : कोयना धरणात आज 87.15 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 87.04 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 145 नवजा येथे 144 व महाबळेश्वर येथे 88  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.


सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 10.07 (86.15), धोम-बलकवडी- 3.60 (91.03), कण्हेर – 8.77 (91.38), उरमोडी – 9.01 (93.32), तारळी- 5.34 (91.32), निरा-देवघर 10.10 (86.14), भाटघर-22.34 (96.32), वीर – 8.87 (94.27).

Previous Post Next Post