सातार्‍यातील पोवई नाक्यावर भाजपचे आंदोलन

 स्थैर्य, सातारा, दि. 18 : खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबाबत काढलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा येथे भाजपच्या वैद्यकीय आघाडी सातारा जिल्हा, सातारा शहर आणि सातारा ग्रामीण यांच्यातर्फे आंदोलन करण्यात आले. पोवई नाका येथे जोरदार निदर्शने करून अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन पाठवण्यात आले. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 18 रोजी सकाळी दहा वाजता श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सर्कल, पोवई नाका याठिकाणी सर्वांनी जमून खा. संजय राऊत आणि त्यांना पाठीशी घालणारे तिघाडी सरकार यांचा निषेध करणारे फलक हाती घेतले होते. सर्वांनी खा. राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यानंतर याबाबतचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांचेमार्फत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांना पाठवले.


यावेळी भाजपचे वैद्यकीय आघाडी सातारा जिल्हा संयोजक डॉ. उत्कर्ष रेपाळ, सातारा शहर संयोजक डॉ. वीरेंद्र घड्याळे, सहसंयोजक डॉ. अभिराम पेंढारकर, सहसंयोजक डॉ. अजिंक्य पवार, व्यापारी आघाडी जिल्हा संयोजक डॉ. सचिन साळुंखे, सातारा शहर उपाध्यक्ष डॉ. अजय साठ्ये, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सातारा शहर अध्यक्ष आणि नगरसेवक विकास गोसावी, सरचिटणीस प्रविण शहाणे, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, सातारा ग्रामीण सरचिटणीस गणेश पालखे, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, जिल्हा चिटणीस सुनील जाधव, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे, सातारा शहराध्यक्ष संदीप वायदंडे, आरोग्य सेवा आघाडी जिल्हा संयोजक विवेक (आप्पा) कदम, युवा मोर्चा सातारा अध्यक्ष विक्रम बोराटे, उद्योग आघाडी सातारा जिल्हा संयोजक निलेश शहा, उद्योग आघाडी शहर संयोजक रोहित साने, अनुसूचित जाती मोर्चा शहर सरचिटणीस विक्रम अवघडे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya