श्रीनगरमध्ये ‘लष्कर’च्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

 


स्थैर्य,श्रीनगर, दि.२५: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहेत्र तर दुसरीकडे दहशतवाद्यांनी शोपियातील सचिवालयात तैनात असलेल्या जवानांवर फायरिंग केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या भागात दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे.

पोलीस अधिका-यांने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षादलाला गुप्त माहिती मिळाली होती की, दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील सिरहामा येथे काही दहशतवादी लपून बसले होते. हे दहशतवादी मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत होते. या माहितीनंतर परिसरात सीमा सुरक्षादलाच्या जवानांनी धाव घेतली. त्यानंतर संपूर्ण परिसरात घेराव घालण्यात आला. दहशतवादी पळून जावू नये म्हणून रात्रभर जवानांनी या परिसरात घेराव घालून ठेवला होता. त्यानंतर सकाळी दोन्ही लष्कर-ए-तोयबाच्या दोन्ही दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya