रयत संघटनेतील सहकारी संस्थांच्यावतीने कराड येथील सह्याद्री हॉस्पिटला 20 पोर्टेबल ऑक्सिजन मशीन भेट

 


स्थैर्य, कराड, दि. १० : कराड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन बेड अपुरे पडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली असणार्‍या रयत संघटनेतील सहकारी संस्थांच्यावतीने कराड येथील सह्याद्री हॉस्पिटला 20 पोर्टेबल ऑक्सिजन मशीन नुकत्याच भेट देण्यात आल्या.

सातारा जिल्ह्यात कोविड बाधित रुग्णाची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासन व जिल्हा प्रशासनाने या पार्श्‍वभूमीवर  कोविड सेंटर उभारण्याबरोबर कोविड सेंटरमध्ये आवश्यक  सुविधा लोकसहभागातून निर्माण करण्याचे आवाहन केले होते. रयत संघटनेचे युवा नेते, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्या पुढाकारातून कोयना सहकारी बँक, कराड शेती उत्पन्न बाजार समिती व स्वा. सै. शामराव पाटील पतसंस्था, उंडाळे या संस्थांच्यावतीने कराडच्या सह्याद्री हॉस्पिटल मध्ये सुरू असणार्‍या कोविड सेंटरला 20 पोर्टेबल ऑक्सिजन मशीन देण्यात आल्या. त्याचे लोकार्पणप्रसंगी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक दिलीपभाऊ चव्हाण, रयत संघटनेचे कार्यवाह धनाजी काटकर आदी उपस्थित होते.

 

यावेळी अ‍ॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, कोविड-19 च्या परस्थितीत शासन व प्रशासनास आम्ही लोकप्रतिनिधी व रयत संघटनेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे प्रयत्न करत आहोत. माजी मंत्री विलासराव पाटील यांच्या सूचनांनुसार कोविड लढ्यात बधितांच्या मदतीसाठी रयत संघटनेच्या माध्यमातून सह्याद्री हॉस्पिटलमधील कोविड सेंटरला 20 पोर्टेबल अक्सिजन मशीन देण्यात आल्या असून या लढ्यात सामान्य माणसाच्या अडचणीत आम्ही सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही दिली.


दिलीपभाऊ चव्हाण म्हणाले, विलासकाका हे सामान्य माणसाचे नेते असून मलाही त्यांचे मार्गदर्शन सातत्याने लाभत आले आहे. कोविड 19 च्या गंभीर परस्थितीत सामान्य माणसांना उपचार मिळावेत, या हेतूतून  सह्याद्री हॉस्पिटलच्या कोविड सेंटरला केलेली मदत लाखमोलाची आहे.


प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी रयत संघटनेच्या मार्गदर्शनाखालील सहकारी संस्थांच्या उपक्रमाचे स्वागत करून कोविडला हरवण्यासाठी सर्वांनी पुढे येऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.


यावेळी कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, कराड तालुका खरेदी- विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात, कराड पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख, स्वा. सै. शामराव पतसंस्थेचे चेअरमन बळवंत पाटील, निवास पाटील, जयसिंग शिंदे, कोयना बँकेचे व्हाईस  चेअरमन विजय मुठेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी माने, खरेदी- विक्री संघाचे संचालक, जगन्नाथ मोरे व मान्यवर उपस्थिती होते. सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक अमित चव्हाण यांनी आभार मानले. Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya