पुण्याच्या ‘आयटी हब’मध्ये २५ किलो गांजा जप्त

 

स्थैर्य, पुणे, दि.२५: अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यामधील हिंजवडीतील ‘आयटी हब’मध्ये ६ लाख ४० हजार किलो रुपयांचा २५ किलो गांजा जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून सहा लाखांपेक्षा जास्त किंमतीचा गांजा जप्त केला आहे. गांजासह अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव योगेश्वर गजानन फाटे (वय २३, रा. जनता वसाहत, गोखलेनगर पुणे) असे आहे.

राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी फेज दोन येथे पुण्यातील एक तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचला आणि योगेश्वर गजानन फाटे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळील बॅगेत ६ लाख ४० हजार रुपयांचा २५ किलो ६०६ ग्रॅम गांजा मिळाला.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya